महान हस्तियों का जन्म
Jan...
12-1-1863 स्वामी विवेकानंद
28-1-1865 लाला लजपतराय
1-1-1894 जगदीश चंद्र बोंज
23-1-1897 सुभाष चंद्र बोंज
13-1-1949 राकेश शर्मा
20-1-1900 जनरल के.ऍम. करिअप्पा
------------------------------------------
Feb...
18-2-1486 महाप्रभु चेतन्य
18-2-1836 रामकुष्ण परमहंस
22-2-1873 मोहम्मद इकबाल
13-2-1879 सरोजिनी नायडु
29-2-1896 मोरारजी देसाइ
------------------------------------------
March...
23-3-1910 डॉ. राममनोहर लोहिया
------------------------------------------
April...
15-4-1469 गुरु नानक देवजी
14-4-1563 गुरु अर्जुन देवजी
14-4-1891 डॉ.भीमराव आंबेडकर
------------------------------------------
May...
5-5-1479 गुरु अमरदास
31-5-1539 महाराणा प्रताप
6-5-1861 मोतीलाल नेहरु
7-5-1861 रविन्द्रनाथ टेगोर
9-5-1866 गोपालकृष्ण गोखले
24-5-1907 महादेवी वर्मा
2-5-1921 सत्यजित राय
------------------------------------------
Jun...
26-6-1838 बंकिमचंद्र चट्टो पाध्याय
------------------------------------------
July...
23-7-1856 लोकमान्य तिलक
31-7-1880 प्रेमचंद मुनशी
29-7-1904 जे. आर. डी. टाटा
------------------------------------------
Aug...
27-8-1910 मधर टेरेसा
29-8-1905 ध्यानचंद
------------------------------------------
Sept...
26-9-1820 ईश्वरचंद्र विद्यासागर
4-9-1825 दादाभाई नवरोजी
10-9-1887 गोविंद वल्लभ पंत
5-9-1888 डॉ. राधाकृष्ण
11-9-1895 विनोबा भावे
27-9-1907 भगतसिंह
15-9-1861 ऍम.विश्वसरेइया
15-9-1876 शरदचंद्र चटोपाध्याय
------------------------------------------
Oct...
1-10-1847 डॉ. ऐनी.बेसन्ट
2-10-1869 महात्मा गांधीजी
22-10-1873 स्वामी रामतीर्थ
31-10-1875 सरदार वल्लभभाई पटेल
31-10-1889 आचार्य नरेन्द्रदवे
11-10-1902 जयप्रकाश नारायण
30-10-1909 डॉ. होमी भाभा
19-10-1920 पांडुरंग शास्त्रीजी
आठवले पु. दादा
------------------------------------------
Nove...
13-11-1780 महाराणा रणजीतसिंह
4-11-1845 वासुदेव बळवंत फडके
7-11-1858 बिपिनचंद्र पाल
30-11-1858 जगदीशचंद्र बोज
5-11-1870 देशबंधु चितरंजनदास
11-11-1888 मौलाना आज़ाद
4-11-1889 जमनालाल बजाज
19-11-1917 श्रीमती इंदिरागांधी
23-11-1926 श्री सत्यसाई बाबा
4-11-1939 शकुंतलादेवी
12-11-1896 सलीमअली
------------------------------------------
Des...
9-12-1484 महाकवि सूरदास
25-12-1861 मदनमोहन मालविया
27-12-1869 ठक्कर बापा
7-12-1879 चक्रवर्ती राजगोपालचारी
3-12-1884 डॉ. राजेन्द्रप्रसाद
30-12-1887 कनैयालालमुनशी
11-12-1931 राजेन्द्रकुमार जेन ओसो रजनीश
22-12-1887 रामानुजम
आधुनिक शेळीपालन
शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागतपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळीघरी आणतो. मग दुसर्या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. अशाच पद्धतीने आपल्याराज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातआहेत.परंतु या पद्धतीत काही ङ्गायदे आहेत आणि काही दोषही आहेत. ङ्गायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्नच नसतो. मात्र या पद्धतीने ङ्गार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्याला शेळी पालनाचा उद्योग ङ्गार मोठ्याप्रमाणावरकरून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाचीनाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आतापुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्यामध्ये कायम कोंडून ठेवूनतिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्यालाबंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.त्याशिवाय ज्या शेतकर्यांना पूर्णपणे बंदिस्तशेळीपालनशक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकर्यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते. त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंदकेल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हा प्रकारच अधिक व्यवहार्य ठरणार आहे. मोकाट शेळी पालनामध्ये आंतरप्रजनन होत असते. त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो. पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजनानवर नियंत्रण ठेवू शकतो. बंदिस्त पालनात शेळ्यांच्या चार्यावर आणि आहारावर खर्च होतो ही गोष्ट खरीआहे. परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन भराभर वाढत जाते. जी गोष्ट मोकाट शेळी पालनात शक्य नाही. बंदिस्त शेळी पालनाचा आणखी एक ङ्गायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. बंदिस्त शेळीपालन करणार्यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा. या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत. निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूने कुंपण असलेले असावे. म्हणजे काही काळ शेळ्या छपराच्या गोठ्यात राहतील आणि काही काळ मोकळ्या हवेला छप्पर नसलेल्या गोठ्यात येतील.कोंबड्याप्रमाणे त्यांना चोवीस तासात छपराच्या गोठ्यात बांधण्याचीगरज नाही. गोठा थोडा उंचावर बांधावा. त्यात हवाखेळावी यासाठीआजूबाजूलाजाळी असावी. तसेच पावसाचे पाणी गोठ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सिमेंट पाईपचे दोन अर्ध गोलाकार तुकडे करून त्यांच्या गव्हाणी बनवाव्यात. त्या गव्हाणीमध्ये चारा आणि खुराक टाकता यावा.अशाचपाईपाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठीही करता येईल. हा गोठा बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गोठा बांधण्यासाठी ङ्गार खर्च करू नये. क्रॉंक्रिटच्या भिंती, सिमेंटचे पत्रे यांची काहीही आवश्यकता नाही. मात्र कोणालाहौसम्हणूनपॉश गोठा बांधायचा असेल तर त्यांना कोणअडवणार ?परंतु अशा गोठ्यावरहोणारा खर्च हा अनुत्पादक खर्च असतो आणि तो शेळ्यांच्या व्यवसायातून वसूल होणे अवघडजाते. मग नफ्या-तोट्याचे गणितबिघडते. शेळी पालन उद्योगामध्ये शेळीचे आरोग्य हा विषय सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे शेळीचा गोठा तयार करताना आरोग्याचा विचार करावा लागतो. विशेषत: शेळ्यांचे मलमूत्र त्या गोठ्यात साचून राहणारनाही याची दक्षता घ्यावी लागते.अजूनही बर्याच शेतकर्यांमध्ये शेळ्यांच्या मरण्याविषयी काही गैरसमज आहेत. शेळ्यांना रोग होऊन त्या पटापट मरतात असे बर्याच लोकांना वाटते. मात्र असे शेळ्या मरण्याचे प्रकार ङ्गार अपवादात्मक असतात. परंतु असा एखादाप्रकार घडला की, त्याच्या बातम्या वृत्तपत्रातमोठ्या प्रमाणावर छापून येतात आणि आधीच असलेला गैरसमज अधिक दृढ होतो. याचा अर्थ शेळ्या मरत नाहीत असा नाही, तर असे प्रकार ङ्गार कमी असतातआणि शेळ्यांच्या विविध रोगांसाठी द्यावयाच्या लसी वेळेवरदिल्या तसेच अधूनमधून आवश्यक असलेले औषध त्यांना देत गेलोतर शेळ्या मरण्याची शक्यता नसते. शेळ्यांच्या अंगावर गोचीड, पिसवा, उवा, लिखा यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अधूनमधून गोचीडनाशक पाण्याची आंघोळ घालावी. शेळ्यांना जंतनाशक औषध सुद्धा पाजावे लागते. ते वर्षातून दोनदा पाजले जाते. अशा औषधांची माहिती आणि उपचार यासंबंधी आपल्या नजिकच्या जनावरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करावी. त्यातल्या काही लसी या दवाखान्यात मिळत असतात. त्यांचा वापर करावा.शेळ्यांवरअसाइलाज करूनही शेळी काही अनामिक कारणाने मरू शकते. तिच्या अशा मृत्यूनंतर तिचीभरपाई मिळण्यासाठी शेळीचा विमा उतरवावा. मध्येच शेळी अचानक मेलीतर विमा कंपनीकडून भरपाईमिळू शकते. महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वावआहे आणि शेतकर्यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते हेही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणार्या संस्था शेळी पालनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करीत आहेत. ज्याशेतकर्यांनाबंदगोठा शेळी पालन करण्यामध्ये रूची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकर्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणीअसलेल्या जिल्हाउद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्ङ्गत काही माङ्गक ङ्गी घेऊन भरवल्या जाणार्या १२ दिवसांच्या शेळीपालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेळी पालनाविषयीच्या सर्व अंगोपांगांची माहिती त्रोटक स्वरुपात काहोईना पण मिळू शकते.सांघिक शेळीपालनशेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचेपूर्णशरीरच उपयोगाचे असते. आपण ङ्गक्त मटणाचाविचार करतो. पण शेळीची कातडी, शिंग, खूड, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचारच करत नाही.हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. शेळीच्या कातडीचा उपयोग तर कसा होतो असतो हे आपल्याला माहीतच आहे. पर्स, बॅगा तयार करण्यासाठी ही कातडीवापरली जाते. त्यानंतर हाडे. बर्याच जणांना हाडांचा एक उपयोग माहीत आहे, तो म्हणजे खत म्हणून. कोणत्याही जनावरांच्या हाडांची भुकटी शेतामध्ये खत म्हणून उपयुक्त असते. परंतु शेळीच्या हाडांची पावडर टूथ पेस्टमध्ये मिसळली जाते. म्हणजे आपणज्या टुथपेस्टने दात घासतो तिच्यात शेळीच्या हाडांची पावडर मिसळलेली असते. हाडांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे टुथपेस्टमध्ये ती मिसळली की, त्या टुथपेस्टमुळे दात मजबूत होतात,हा त्यामागचा विचार असतो. बरेच शाकाहारी लोक शाकाहाराची कडक पथ्ये पाळत असतात. त्यातल्या ज्या लोकांना टुथपेस्टमध्ये हाडे असतात हे माहीत असते ते लोक टुथपेस्टने दात घासत नाहीत ते यामुळेच. शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तूपरदेशात पाठविल्या तर त्यांना चांगली किंमत येते.आपण एखादी शेळी किंवा बोकड दोन किंवा तीन हजाराला विकून टाकतो,परंतु शिंगांचा योग्य वापर करणारा मासूण नुसत्या शिंगापासून दोन हजार रुपये कमवू शकतो. तशीच अवस्था खुरांची सुद्धा असते. शेळीच्या आणि बोकडांच्या खुरापासून शर्टाच्या गुंड्या (बटन) बनवल्या जातात. मेंढ्यांच्या केसापासून लोकर तयार होते हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु शेळीचे केस सुद्धा उपयुक्त असतात. या केसापासून पश्मिना नावाचा कपडा तयार होतो. हा कपडा ङ्गार महाग असतो. विशेषत: कोटांच्या आतल्या बाजूला अस्तर म्हणूनपश्मिना कापड वापरले जाते. पश्मिना कापडाच्या शाली आणि गरम कपडे ङ्गार महाग असतात. पश्मिनाचे एखादे स्वेटर साधारणत: हजार रुपयांना विकले जाते. शेळीच्या केसापासून हा कपडा तयार करण्याचे कसब काश्मीर आणि तिबेटमधल्या काही विशिष्ट कलाकारांनाच अवगत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांनी आपल्या शेळ्या निव्वळ विकून न टाकता सामूहिकरित्या कत्तलखाने उभे केले तर शेळीचे केस, खूर, शिंग, हाडे आणि चामडी या सर्वांचे पैसे शेतकर्यांच्याच पदरात पडू शकतील. म्हणून शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आपले स्वत:चेच कत्तलखाने उभे करणे ङ्गायद्याचेठरणार आहे.
आधुनिक शेळीपालना बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण व प्रकल्प अहवालासाठी संपर्क करा
चावडी शाखा
तुळजाई बिझनेस सोलूशन्स
परतवाडा , जिल्हा -- अमरावती
मो - 9860209533 / 9096669538 ,
Visit our website --www.Chawadi.co.in
इस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व...
पाण्याचे दुर्भिक्ष, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, अत्यंत कमी पाऊस अशा प्रतिकूल गोष्टींशी टक्कर देत इस्राईलने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कृषी प्रगती साधली आहे. इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये उत्पन्न मिळवितो. पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते. सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादन चौपट वाढ झाली आहे. इस्राईलमध्ये पावसाचे पाणी भूगर्भात साठविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. या साठविलेल्या पाण्यातून देशाची 60 टक्के पाण्याची गरज भागविली जाते. इस्राईलमध्ये भूगर्भातील पाणीसाठ्याची दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत. यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील झरे (ऍक्विफर) आणि दुसरा पर्वतीय विभागातील झऱ्यातून पाणीसाठा तयार केला जातो. याशिवाय उत्तरेकडील गोलन टेकड्या व पश्चिमेकडील किनरेट तळ्याजवळ लहान शेकडो झरे आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून दरवर्षी सुमारे 25 कोटी घनमीटर व पर्वतीय विभागातील झऱ्यातून सुमारे 35 कोटी घनमीटर पाणी उचलले जाते. समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून प्रमाणापेक्षा जास्त पाणी उचलल्यास गोड्या पाण्याची पातळी खाली जाते. त्यामुळे ऍक्विफरमध्ये खारे पाणी मिसळून क्षाराचे प्रमाण वाढते. पाणी वापरण्यायोग्य राहत नाही. झऱ्याच्या साठ्यातून उचललेल्या जादा पाण्याची योग्य पातळी राहावी म्हणून किनरेट तलावात पावसाळ्यात जादा झालेले पाणी बंदिस्त पाइपमधून झऱ्यांच्या साठ्यात सोडले जाते. अवर्षणाच्या वेळी जादा उचलले पाणी पावसाळ्यात पुनःश्च त्या पातळीवर आणणारा इस्राईल हा जगातील एकमेव देश आहे. या दोन झऱ्याशिवाय इस्राईलमध्ये भूपृष्ठात पाणीसाठा करण्यासाठी सुमारे 2800 विहिरी असून 150 कूपनलिका आहेत. यामधील काही विहिरी व बोअरवेल्स खास अवर्षणाच्या वेळी उचललेल्या पाण्याचे हिवाळ्यात पुनर्भरण (रिचार्ज ऑफ वॉटर) करण्यासाठी ठेवल्या आहेत. याशिवाय भूपृष्ठावरील पावसाळ्यात वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून लहान लहान तळी व तलावांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. इस्राईलमध्ये हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात पाऊस पडतो. 2) किनरेट तलाव (सी ऑफ गॅलीली) इस्राईलमधील गोड्या पाण्याचा एकमेव आणि मोठा तलाव जॉर्डन नदीवर नैसर्गिक खच दरीतून निर्माण झाला आहे. हा तलाव नैसर्गिकरीत्या खचलेल्या भागात म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा 740 फूट खोलीवर असल्याने जॉर्डन नदीचे पाणी येथे मोठा बंधारा न बांधता साठून राहते. या तलावाची एकूण क्षमता 400 कोटी घनमीटर असून, या तलावातून दरवर्षी 50 कोटी म्हणजे देशाच्या एकूण गरजेच्या 25 टक्के पाणी वापरासाठी घेतले जाते. इस्राईलला वार्षिक सुमारे 200 कोटी घनमीटर पाणी लागते. तलावाचा संपूर्ण साठा वापरावयाचा झाल्यास या तलावाचे पाणी इस्राईलला दोन वर्षं पुरेल. तथापि, बाष्पीभवनाने वाया जाणारे पाणी, तसेच पुढील वर्षी कदाचित पाऊस पडला नाही तर दुष्काळ विचारात घेऊन ते एकूण क्षमतेच्या 25 टक्के पाणी वापरले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी 50 कोटी घनमीटर पाणी उचलून 350 कोटी घनमीटर पाण्याची पातळी कायम ठेवली जाते. किनरेट तलाव इस्राईलमधील पाण्याचा राखीव साठा आहे. तलावातील मर्यादित पाणी पुरवून कसे वापरावे याचे किनरेट तलाव उत्तम उदाहरण आहे. या तलावाची लांबी 21 किलो मीटर व रुंदी आठ किलोमीटर आहे. पुनर्वापरात आणलेल्या पाण्यातून घरगुती वापर व उद्योगधंद्यांसाठी पाण्यावर सुमारे 70 टक्के प्रक्रिया करून शेतीच्या वापरासाठी दिले जाते. त्यामुळे देशाची एकूण 15 टक्के गरज भागविली जाते. इस्राईलमध्ये पुरवठा केलेल्या पाण्यापैकी 60 टक्के पाणी शेतीसाठी, दहा टक्के पाणी उद्योगधंद्यासाठी व 30 टक्के पाणी घरगुती वापरासाठी दिले जाते. शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा कंपनीस 1000 लिटर पाण्यास दहा रुपये इतका खर्च येतो. शेतकऱ्यांना शेतीसाठी द्यावयाच्या पाण्यास सरकारमार्फत 50 टक्के अनुदान दिले जाते. इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये मिळवितो. पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादनात चौपट वाढ झाली आहे. आपल्या शेतकऱ्यांनी आणि सरकारने या गणिताचा जरूर विचार करावा. इस्राईलमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा पीक पद्धतीनुसार कोटा ठरवून दिला जातो. ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा करणे त्यास बंधनकारक आहे. तथापि, ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी हवे असल्यास शासनाकडे तशी मागणी करावी लागते. शासन पाण्याच्या आवश्यकतेची खात्री करून नेहमीपेक्षा दुप्पट दराने पाणीपुरवठा करते. पाण्याच्या अशा प्रकारे प्रचंड मर्यादा असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने नियोजनबद्ध रीतीने ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा पीक प्रकारानुसार 100 टक्के वापर केलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आवश्यक शेतावर पाणीपुरवठ्यासाठी स्वयंचलित संगणक बसविला आहे. त्यामुळे शेतीस आवश्यक तेवढे पाणी दिले जाते. या देशात पाटाने अजिबात पाणी दिले जात नाही. पण पाणी निश्चितपणे पाहिजे त्या वेळी मिळते. नाहीतर आपणाकडे पाण्याची पाळी 15 दिवसांपासून एक महिन्यापर्यंत कशीही लांबते. याचा परिणाम प्रति एकरी उत्पन्नावर होतो. फिल्टरचे तंत्रज्ञान ः ठिबक सिंचन पद्धतीमध्ये फिल्टरला अतिशय महत्त्व आहे. ठिबक संच बसविण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता व दर्जा कोणत्या प्रकारचा आहे हे विचारात घ्यावे लागते. इस्राईलमध्ये फिल्टरेशन तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. त्यासाठी त्यांनी दर्जेदार, टिकावू व कार्यक्षम फिल्टर तयार केले आहेत. पाणी कितीही प्रदूषित असले तरी अतिशय वेगाने ते फिल्टरमध्ये आत घेतले जाते. आतील जाड चकत्या वेगाने फिरतात त्यामुळे स्वच्छ पाणी खाली पाइपमध्ये येते व पाण्यातील घाण फेसासारखी वरच्या भागात साठविली जाते व ठराविक वेळेला विरुद्ध दिशेकडून पाण्याचा प्रवाह येऊन घाण व्हॉल्व्हद्वारे बाहेर टाकली जाते व फिल्टर आपोआप साफ केला जातो. ड्रीपरचा वापर ः इस्राईलमध्ये ठिबक संच तयार करता असताना तो सहज, सुलभ वापरायोग्य व कमीत कमी देखभाल लागेल असे तयार केले जातात, पाइपच्या बाहेर ड्रीपर असल्यास ते पाइप शेतात अंथरताना किंवा काढताना मोडण्याची, तुटण्याची शक्यता असते. कारण इस्राईलमध्ये पाइप टाकणे किंवा परत गोळा करणे ही कामे यंत्रामार्फतच केली जातात. याकरिता त्यांनी इनलाईन ड्रीपर पद्धती शोधून काढली आहे. इस्रायली कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या ड्रीपरची निर्मिती केली असून पाणी देणे बंद केल्याबरोबर ड्रीपरमधून पाणी बाहेर पडण्याचे थांबते, त्यामुळे पाइपमधीलही पाणी वाया जात नाही किंवा पिकास जास्त दिले जात नाही. या तंत्रामुळे पाण्याची लक्षणीय बचत होते कारण ग्रीन हाऊसमध्ये पिके वेगवेगळ्या माध्यमांमध्ये घेतली जातात. पिकाच्या योग्य वाढीकरिता दिवसातून बऱ्याच वेळेला पाण्याचा वापर केला जातो. काही कंपन्यांनी एका वेळी 18 x 18 मीटर एवढ्या अंतरावरील पिकांना पाणी देता येईल असे तुषार संच बनविलेले आहेत. ठिबक सिंचनातून इस्राईलने अतिशय नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. हजारो एकर फळबागा, फुलशेती, स्ट्रॉबेरीची शेती, ठिबक सिंचनावर डोलताना बहरताना दिसून आल्या, एवढेच काय त्यांनी रस्त्यावरील झाडांना, विमानतळावरील हॉटेलसमोरील लहान लहान झाडांनासुद्धा ठिबकनेच पाणी दिले आहे. याउलट आपण ठिबक सिंचनामध्ये म्हणावी तशी प्रगती करू शकलो नाही. कारण आपल्याकडील शेतकऱ्यांना अद्यापही ठिबक पाणी पद्धतीचे महत्त्व पटलेले नाही. पाणी व्यवस्थापनाच्या फवारा पद्धतीमध्ये कायम स्वरूपी फवारा, फिरता फवारा, गन फवारा, गन फवारा, कमी दाबाचा फवारा, वैयक्तिक झाडापुरता छोटा फवारा, एका विशिष्ट दिशेने फिरणारा फवारा असे वेगवेगळे प्रकार असून एका वेळी 160 एकरांपर्यंत गोलाकार क्षेत्र फिरून भिजविणारा फवारा सिंचन हे येथील खास वैशिष्ट्य आहे. मुख्य पाइपवर बसविलेल्या तोट्यांच्या साह्याने पाणी सभोवार पिकावर फवारले जाते. हा फवारा संच शेतात कायमस्वरूपी बसविलेला असतो. मोटारच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने हा संच मागे पुढे पाहिजे त्या प्रमाणे हलविता येतो. सदरचा संच एका बाजूला स्थिर ठेवलेला असतो व दुसरी बाजू गोलाकार फिरून शेतामधील पिकास फवारा पद्धतीने पाणी दिले जाते. आपल्या राज्यात पाण्याच्या नियोजनाबाबत भरपूर करता येणे शक्य आहे. इस्राईलच्या गोलन टेकड्या व उत्तरेकडील वातावरण आपल्या महाराष्ट्रातील कोकण विभाग, थंड हवेची ठिकाणे व डोंगरी भागातील वातावरणाशी काही प्रमाणात मिळते जुळते आहे. इस्राईलमध्ये उत्तरेकडे पाऊस 700 मि.मी. तर आपल्या या भागात 3000 ते 4000 मि.मी. एवढा प्रचंड पाऊस पडतो. असे असूनही पावसाळ्यात जास्त पाऊस पडणाऱ्या या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. राज्यातील दुष्काळसदृश तालुक्यात वार्षिक 500 ते 600 मि.मी. एवढा पाऊस पडतो. याउलट इस्राईलमध्ये जास्त पाऊस पडणाऱ्या विभागात 600 ते 700 मि.मी. पाऊस पडत असूनही केवळ पाणी अडविण्याच्या व जिरविण्याच्या प्रभावी मोहिमेमुळे व पाण्याच्या नियोजनामुळे वर्षभर देशास पाणीपुरवठा करणे त्यांना शक्य झाले आहे. संगणक नियंत्रित ठिबक आणि फवारा सिंचन ः इस्राईलमध्ये सिंचन पद्धतीबाबत अतिशय सखोल अभ्यास करून संगणक नियंत्रित ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. सिंचन व्यवस्थेकरिता इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य शोधून काढले आहे. त्याच्या वयोमानाप्रमाणे तसेच जमिनीची प्रत, हवामान या सर्व बाबींचा बाराकाव्याने अभ्यास करून त्या झाडास पाणी किती व कधी लागेल त्या सर्व बाबी ठरविण्यात आल्या. त्याची सर्व माहिती संगणकास पुरवून ठिबक सिंचनाचा संच संगणकास जोडला जातो. या संगणकाद्वारे पिकास आवश्यक तेवढेच व आवश्यक वेळी पाणी दिले जाते. ठिबक सिंचनाचा वापर करताना पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या जाडीचाही त्यांनी विचार केला आहे. एखाद्या झाडास साधारणपणे आठ तासात किती पाणी लागते, त्यासाठी किती जाडीचा थेंब व किती वेगाने तो ड्रीपरमधून बाहेर पडावा अशा प्रकारचे त्या ड्रीपरला छिद्र पाडली जातात. ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्रवरूप खते झाडाच्या मुळाजवळच दिली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टाळून त्यांचा योग्य मोबदला मिळतो. रिमोट कंट्रोल बसविलेले संगणक हे काम माणसापेक्षा अतिशय बिनचूक व चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळे संगणकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या काही संस्था इस्राईलमध्ये निर्माण झाल्या आहेत. संगणक वापराचे फायदे ः 1) संगणक नियंत्रित पद्धतीत पिकांना पाणीपुरवठा दररोज ठराविक वेळेला व ठराविक कालावधीसाठी पिकाचे त्या दिवशीच्या आवश्यकतेनुसार केला जातो. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनवाढीस मदत होते. 2) संगणक पिकांना नियमित व अखंडपणे पाणीपुरवठा करत असताना आवश्यकतेनुसार व्हॉल्व्ह (झडपा) बंद व चालू करणे इ. कामे करतो. पिकाचा प्रकार, मातीचे गुणधर्म व त्या दिवशीचे असणारे हवामान, पाण्याची गळती, पाणी वाहण्याची गती, वीजपुरवठा या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवून आवश्यक तेवढेच पाणी देतो. 3) संगणकामुळे खते योग्य प्रमाणात व योग्य वेळी दिली जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढविता येते. पाणी व खते एकाचवेळी दिल्यास पिकास आवश्यक अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळतात. पाण्यातून खते देता यावीत यासाठी इस्राईलमध्ये सर्व प्रकारची खते द्रवरूप तयार केली जातात. 4) काही तांत्रिक दोषामुळे जास्त दाबाने पाणी आल्यास व त्यामुळे काही ठिकाणी पाइप फुटून पाणी वाहू लागल्यास संगणकाद्वारे त्या ठिकाणचे व्हॉल्व लगेच बंद केले जातात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही