संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ

Thursday, January 01, 2015

संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ

ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव — बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.

श्री गणेशाला नमन
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं  तं नमामि भवबालकरत्नम् ||
मराठी मध्ये अर्थ:
देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो.


संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः |
जगतः पतिरंशतोवतापोः  (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः  |
मराठी मध्ये अर्थ:
कलिकारुपी भुजंग घालीतो  विळखा,  करितो धर्माचा ऱ्हास.
तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास.


संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
भृशत्  बलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः ||
मराठी मध्ये अर्थ:
सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले.


Sankrit Granth by Sambhaji


बुधभूषणम् या ग्रंथाच्या लेखनास सुरुवात करताना.
तस्यात्मजः शंभुरिति प्रसिद्धः समस्तसामंतशिरोवतंसः |
यः काव्यसाहित्यपुराणगीतकोदण्डविद्यार्णवपारगामी ||
विविच्य शास्त्राणि पुरातनानामादाय तेभ्यः खलु सोयमर्थम् |
करोति सद्ग्रंथममुं नृपालः स शंभुवर्मा बुधभूषणाख्व्यम् ||
मराठी मध्ये अर्थ:
– त्या शिवाजी राजांचा – भोवतीच्या साऱ्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा,
काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र – ‘शंभूराजे’ या
नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी
शंभू हा ‘बुधभूषणम्’ नावाचा सद्ग्रंथ रचीत आहे.

You Might Also Like

0 comments