आर. के. लक्ष्मण यांचे स्मारक उभारणार - मुख्यमंत्री
Tuesday, January 27, 2015
पुणे - व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण आपल्या देशाचे वैभव होते. जगाच्या
शेवटापर्यंत त्यांचा "कॉमन मॅन‘ जिवंत राहील. तो राजकीय, सामाजिक,
प्रशासकीय व्यवस्थेवर आज ठेवतो त्याप्रमाणे कायम अंकुश ठेवेल. त्यांच्या
जीवनकार्याला उजाळा देणारे स्मारक राज्य सरकारकडून लवकरच उभारण्यात येणार
असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली.
लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे म्हणाले, ""सामान्यांचा आवाज "आरके‘ यांच्या चित्रांतून उमटत असे. त्याचवेळी त्यांना विश्वासही देत असत. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहेच; पण त्यांच्या निधनाने आज "कॉमन मॅन‘ पोरका झाला आहे.‘‘
उद्धव ठाकरे (कार्याध्यक्ष, शिवसेना) ः एका कुंचल्याचा आज अखेर झाला. बाळासाहेब ठाकरे व आर. के. लक्ष्मण या दोघांची मैत्री व ऋणानुबंध सगळ्यांना माहिती होता. या दोघांनीही आपल्या कारकिर्दीला एकाचवेळी सुरवात केली. 2011 मध्ये बाळासाहेब त्यांना भेटण्यासाठी खास पुण्याला आले होते. तो आमच्यासाठी हृदयस्पर्शी क्षण होता. ते दोघेही एकमेकांच्या व्यंग्यचित्रांचे निस्सीम चाहते होते. ते दोघेही कुंचल्यांचे सम्राट होते.
प्रकाश जावडेकर (केंद्रीय पर्यावरण मंत्री) ः रोज सकाळी वर्तमानपत्रांमध्ये मार्मिक टिपण्णीद्वारे सगळ्यांना हसविणारी त्यांची व्यंग्यचित्रे होती. त्यांच्या जाण्यामुळे सकाळचे हसविणारे क्षण आता हरपले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्मण यांच्याविषयी अतिशय आदर आहे. त्यांनीही निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गिरीश बापट (पालकमंत्री) ः लक्ष्मण हे एक जागतिक कीर्तीचे व्यंग्यचित्रकार होते. ते केवळ चित्र काढत नसत, तर सामाजिक व राजकीय विषयांवर टिपण्णी करत. त्याद्वारे सामान्य माणसांच्या मनातील भावना समाजापर्यंत पोचविण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला जुमानले नाही. आपल्याला अपेक्षित आणि समाजाचे प्रबोधन करण्याचे काम त्यांच्या व्यंग्यचित्रांनी केले.
पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री) : सर्वसामान्यांचा आवाज ज्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून व्यक्त केला, असे "आरके‘ आपल्यातून निघून गेले याचे दु:ख आहे. त्यांच्या "कॉमन मॅन‘ने अनेकांवर अंकुश ठेवला. तो कॉमन मॅन यापुढेही सतत आपल्या दिशा देईल.
व्यंग्यचित्रांनीच ऊर्मी दिली
""बाबांनी कायम रूढी-परंपरांच्या विरोधात भूमिका मांडली. व्यंग्यचित्र काढत असतानाच त्यांनी आपल्या आयुष्याचा मनसोक्त आनंद लुटला. नुकत्याच झालेल्या मंगळ मोहिमेवेळी त्यांनी सामान्य भारतीय माणूस मंगळावर उतरल्याचे एक व्यंग्यचित्र काढले होते. ते पाहून आम्हा सर्व कुटुंबीयांना मोठा आनंद झाला. बाळासाहेब ठाकरे व बाबांमध्ये खूप चांगली मैत्री होती. आजीचे निधन झाले तेव्हा बाबा खचले नाहीत. त्यांना त्यांच्या व्यंग्यचित्रांनीच ऊर्मी दिली,‘‘ अशा भावना श्रीनिवासन लक्ष्मण ("आरके‘ यांचे पुत्र) यांनी व्यक्त केल्या.

0 comments