ये है इंडिया.
Tuesday, January 27, 2015
‘तरुण’ होत असलेल्या महत्त्वाकांक्षी देशाला सलाम करण्यासाठी एका
महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष दहा हजार मैलांचा प्रवास करून येतो, तेव्हा या
देशातल्या तरुणांनाही माहिती असायला हवं की,
असं आहे काय आपल्या देशाकडे?
‘प्राइड वगैरे ठीक, पण देश म्हणून स्ट्रेन्थ काय आहे तुमची ?’ - असा
प्रश्न येत्या प्रजासत्ताक दिनाला विचारलाच कुणी तुम्हाला; तर काय उत्तर
द्याल? तेच ते टिपिकल.
जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, जगातला सगळ्यात तरुण देश, हजारो वर्षाची
महान संस्कृती-परंपरा अनेकता में एकता. - हेच सांगाल; स्वत:ला आणि
इतरांनाही?
काळ पुढे सरकला आहे मित्रंनो, नुस्त्या भावनिक ना:यांना आता कोण भाव देतं.?
फॅक्ट्स सांगा, फिगर्स सांगा, महासत्ता होण्याचे दावे करता, नेमकी तुमची बलस्थानं सांगा,
जगाच्या तुलनेत तुम्ही नेमके कुठे उभे आहात हे सांगा. - असं कुणी विचारलंच तर काय सांगाल?
आहे काही तपशील हाताशी.?
***
येत्या सोमवारी आपण 66 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. दिल्लीत
लाल किल्ल्यावरच्या परेडमध्ये दरवर्षी होतंच ‘शक्तिप्रदर्शन’ आपल्या
खंडप्राय देशाच्या ताकदीचं!
आणि यंदा तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी आहेत.
भारताच्या आणि अमेरिकेच्याही इतिहासात पहिल्यांदाच कुणी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
लाल किल्ल्यावर तिरंग्याला सलामी देणार आहे. या ऐतिहासिक क्षणी ‘तरुण’ देशाची ताकद म्हणून
आपल्याला विचारलंच कुणी की, सांगा. काय काय आहे तुमच्याकडे? तर?
***
भावनेपलीकडे जाऊन आपल्या देशाच्या शक्तिस्थानांचा अंदाज
यावा, आपल्याकडे काय आहे याचा तपशील आपल्याही हाताशी असावा आणि आपल्या
देशाला नावं ठेवण्यापूर्वी आणि अतीच भावुक होत देशप्रेमाचे नारे
देण्यापूर्वी आपल्याला माहिती असावा आपला देश.
म्हणून तर आज हा विशेष अंक.
***
लाल किल्ल्यावर 26 जानेवारीची परेड असते आणि त्या परेडमध्ये ‘झांकी’
असते; आपल्या शक्तीची, आपल्या क्षमतांची आणि आपल्या उत्स्फूर्त रंगबिरंगी
जगण्याची. तीच ‘झांकी’ म्हणजे हा अंक.
***
तुम्हारे पास क्या है?
या प्रश्नाचं उत्तर आहे हा अंक. वाचा आणि मग ठामपणो म्हणा; ‘ये है इंडिया’. माझा देश; माझी ताकद ! जय हिंद !!
0 comments