फ्री इंटरनेट स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

Tuesday, January 27, 2015

DATA 
डेटाविंड ही मोबाइल कंपनी एक असा मोबाइल फोन बनविण्याच्या विचारात आहे ज्यामध्ये एका वर्षापर्यंत इंटरनेट सेवा मोफत असणार आहे. यासाठी डेटविंडने 150 कोटींचे बजेट निश्चित केले आहे. या फोनची किंमत 3,000 रु. असण्याची शक्यता आहे.

कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी सुनीत सिंह तुली यांनी सांगितले की, 'आम्ही काही खासगी मोबाइल सेवा कंपन्यासोबत याविषयी चर्चा सुरु केली आहे. त्यांच्या मदतीने बेसिक इंटरनेट (मोफत) असणारा फोन लाँच करण्याचा विचार आहे. मोफत इंटरनेट सेवा वर्षभर असणार आहे. या मोबाइलची किंमत 3000 रुपये असायला हवी.'

मोबाइल तज्ज्ञांच्या मते, भारतातील 76 टक्के ग्राहक हे 4000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन खरेदी करण्यास पसंती देतात. तर 60 टक्के ग्राहक 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा मोबाइल खरेदी करतात.

'यामधील अनेक ग्राहक हे इंटरनेट सेवा वापरत नाही. त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच अशा ग्राहकांना मोफत इंटरनेट सेवा देण्याच्या विचारात आहोत आणि हळूहळू इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल अशी आशा आहे.'असे तुली यांनी सांगितले.

You Might Also Like

0 comments