साहस आजमावायला ‘एन्ड्युरो’ आली

Tuesday, January 27, 2015

mek 
ट्रेकिंग, सायकलिंग, कयाकिंग, रायफल शूटिंग अशा साहसी प्रकारांचं आव्हान आणि रेकॉर्ड ब्रेक टशन असं यंदाच्या 'एन्ड्युरो-३' या स्पर्धेचं आव्हान आहे. नवनवे रेकॉर्ड रचण्यासाठी साहसप्रेमींनी यात सहभागी व्हावं, असं आवाहन 'नॅशनल एज्युकेशन फाउंडेशन'नं केलं आहे.

खुल्या आणि हौशी गटासह महाविद्यालयीन गट, शालेय गट, आयटी-कॉर्पोरेट गट, डॉक्टर, शिक्षक, पोलिस, फॅमिली आणि ४० प्लस अशा दहा विभागांतून स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. एका संघात तिघं आणि त्यात किमान एका मुलीचा सहभाग अनिवार्य असणार आहे.

गटांनुसार ४० ते २०० किलोमीटर असं स्पर्धेचं अंतर असेल. सिंहगड, पानशेत, राजगड, तोरणा आणि माणगाव या परिसरात येत्या ७ आणि ८ फेब्रुवारीला ही सांघिक क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. यंदाही राज्यभरातील साहसप्रेमींचा सहभाग यात असेल.

You Might Also Like

0 comments