आशा भोसलेंना जीवनगौरव

Monday, January 19, 2015

ashabhosle 
दुबई : दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात येणारा 'जीवन गौरव पुरस्कार' यंदा प्रख्यात गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. हा चित्रपट महोत्सव १० ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

आशा भोसले यांनी १२ हजारांहून अधिक गाणी गात विश्वविक्रम केला आहे. आशाजींनी सिनेसृष्टीत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, या महोत्सवाला उपस्थित राहण्याचा मनोदय आशा भोसले यांनी व्यक्त केला आहे.

You Might Also Like

0 comments