अमेरिका चार अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात करणार

Tuesday, January 27, 2015


अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतासोबतचे व्यावसायिक नाते आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने देशात चार अब्ज डॉलरची गुंतवणूक व कर्जाची घोषणा केली़
सोमवारी संध्याकाळी भारत-अमेरिका बिझनेट समिटममध्ये ओबामा सहभागी झाले़ येत्या दोन वर्षांत अमेरिकन आयात-निर्यात बँक भारताला एक अब्ज डॉलर कर्ज देईल़ यूएस ट्रेड अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी दोन अब्ज डॉलर देईल़ याशिवाय अमेरिकेतील ओव्हरसीज प्रायव्हेट इनव्हेस्टमेंट कार्पोरेशन भारताच्या मागास ग्रामीण भागात लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक अब्ज डॉलरचे कर्ज देईल, अशी घोषणा ओबामांनी योवळी केली़
भारत व अमेरिका दोन्ही देश खरे जागतिक भागीदार आहेत़़ एकमेकांसोबत पुढे जात, उभय देश समुद्ध होऊन जगापुढे आदर्श निर्माण करू शकतातग़त काही वर्षांत भारत-अमेरिकेतील व्यापारात ६० टक्क्यांने वाढ होऊन तो १०० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे़ अमेरिका हा भारतात गुंतवणूक करणारा सहावा मोठा देश आहे़ सन २०२५ पर्यंत उभय देशांतील व्यापार ५०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे अमेरिकेचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले़ या परिषदेसाठी रतन टाटा, मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल, गौतम अदानी, नारायणमूर्ती यांच्यासह देशातील अनेक दिग्गज उद्योगपतींनी हजेरी लावली होती.

You Might Also Like

0 comments