'मेक इन महाराष्ट्र'ला येणार गती
Tuesday, January 27, 2015
मुंबई - राज्यातील उद्योगांना चालना मिळावी यासाठी सरकारने प्रयत्न सुरू
केले आहेत. "मेक इन महाराष्ट्र‘ला गती देण्यासाठी यापुढे प्रत्येक
जिल्ह्यात वार्षिक "उद्योग दिवस‘ साजरा केला जाणार आहे.
उद्योग-व्यवसायाचे
विकेंद्रीकरण करून राज्याचा समतोल औद्योगिक विकास घडवण्यासाठी राज्याचे
उद्योग खाते कामास लागले आहे. केंद्र सरकारच्या "मेक इन इंडिया‘च्या
धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मेक इन महाराष्ट्र‘ ही
संकल्पना राबवण्यास सुरवात केली आहे.
या भूमिकेची अंमलबजावणी
करताना प्रत्येक जिल्ह्यात यापुढे दरवर्षी "विश्वकर्मा जयंती‘ या दिवशी
"उद्योग दिवस‘ साजरा करण्यात येईल. या दिवशी सूक्ष्म, लघू व मध्यम
उद्योजकांसाठी एकाच ठिकाणी उत्पादनाचे प्रदर्शन भरविणे, उत्पादनांची विक्री
करणे, त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कार्यशाळा व चर्चासत्रे
आयोजित केली जातील. उदयोन्मुख उद्योजकांना दिले जाणारे पुरस्कारही याच
दिवशी देण्यात येणार आहेत. या दिवसाच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी
यांच्यामार्फत जिल्हास्तरावर एक उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. या
दिवसाच्या उद्योगविषयक विविध उपक्रमांचे आयोजन ही समिती करेल.
0 comments