शासकीय गोदामातून धान्य गायब

Tuesday, January 27, 2015

कोट्यवधींचा अपहार; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सुरगाणा - येथील शासकीय धान्य गोदामात 30-9-14 ते 19-12-14 या तीन महिन्यांच्या कालावधीत गहू, तांदूळ, साखर आदी वाणांचा सुमारे एक कोटी रुपये किमतीचा अपहार झाल्या प्रकरणी गोदाम माल पुरवठा निरीक्षक सुरगाणा यांच्यासह अन्य पाच जणांच्या विरोधात शासकीय धान्याचा अपहार केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्‍वर जवजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील तीन महिन्यांच्या कालावधीत रमेश दौलत भोये (गोदामपाल, सुरगाणा), मेसर्स एस. एन. मंत्री यातील भागीदार मोरारजी भिकुलाल मंत्री, सुषमा मोरारजी मंत्री, संजय रामकृष्ण गडाख, श्रीराम नारायणदार मंत्री, वाय. एस. मंडलिक (वाहतूक प्रतिनिधी, नाशिक रोड- अंबड गोडाउन), हरिचंद्र गुलाब धुम (पुरवठा निरीक्षक, सुरगाणा) यांनी संगनमताने शासकीय वितरण व्यवस्थेतील रेशनिंगचा गहू-215557 क्विंटल 39 किलो, याची अनुदानित किंमत 65,81,835, तांदूळ- 9051 क्विंटल 77 किलो यांची अनुदानित किंमत 2972729, साखर- 73 क्विंटल याची अनुदानित किंमत 2,1900..... अशी एकूण अनुदानित किंमत 9576464 रुपये किमतीच्या शासकीय मालाचा कागदोपत्री साठा दाखवून प्रत्यक्ष साठा न ठेवता सदर माल परस्पर विक्री करून सुरगाणा येथे आणण्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ेदरम्यान, या मालाची खुल्या बाजारातील किंमत गहू-32336096 (कोटी 23 लाख 36 हजार 96 रुपये), तांदूळ 1 कोटी 81 लाख 3 हजार 543 रुपये, साखर- लाख एकोणावीस हजार अशी एकून पाच कोटी सहा लाख अठ्ठावन्न हजार सहाशे एकोणचाळीस रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे.

You Might Also Like

0 comments