मोदींच्या सुटावरून वाद

Tuesday, January 27, 2015

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या "एम्ब्रॉयडिंग‘ सुटावर माजी केंद्रीयमंत्री आणि कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी कडाडून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचे हे कृत्य विक्षिप्तपणाचे असून, यातून केवळ त्यांची हुकूमशाही प्रवृत्तीच दिसून येते, दुसरे तिसरे काहीही नाही, असे रमेश यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या विशेष सुटावर त्यांचेच पूर्ण नाव कोरण्यात आले होते. सोशल मीडियामध्ये हा फोटो झळकताच नव्या वादाला तोंड फुटले होते. अनेकांनी मोदींच्या या पोशाखाचे तोंडभरून कौतुक केले, तर काहीजणांनी त्यावर टीकाही केली आहे. मोदींचा हा गळाबंद सूट अहमदाबादेतील "जेड ब्लू‘ या कंपनीने शिवल्याचे समजते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ही कंपनी त्यांच्या पोशाख निर्मितीचे काम पाहते. याच कंपनीचे प्रोप्रायटर बिपीन चौहान यांनीच "मोदी कुर्त्या‘चा ब्रॅंड तयार केला आहे. इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक हेदेखील असाच स्वत:चे नाव कोरलेला सूट परिधान करत असत.

You Might Also Like

0 comments