ओबामांचे 'नमस्ते इंडिया'
Tuesday, January 27, 2015
सर्वोत्कृष्ट भागीदारीची ग्वाही; दौऱ्याची यशस्वी सांगता
भविष्यातील सर्वोत्कृष्ट भागीदारीची ग्वाही देत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याची आज सांगता झाली. निरोप घेताना त्यांनी उच्चारलेले "नमस्ते इंडिया‘ हे शब्दच याची खात्री देत होते. एकमेव महासत्तेचे बलशाली अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणे, हे भारताच्या बदलत्या राजकारणाचे आणि वाढत्या महत्त्वाचे द्योतक मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
ओबामा यांची मैत्री केवळ राजकारणापुरती नसल्याचे त्यांच्या देहबोलीवरून
दिसून आलेच; शिवाय "मन की बात‘ या कार्यक्रमांत सहभागी होऊन ओबामा यांनी एक
प्रकारे आपण राजकारणापलीकडेही मित्रांकडे पाहतो, हे दाखवून दिले.
ओबामा
यांचा दौरा भारताच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरला. नागरी अणुकरारातील
अडथडे दूर झाले, संरक्षणविषयक दहा करारांना चालना मिळाली, उद्योजकांच्या
गाठी-भेटी झाल्या, तसेच भारतात चार अब्ज डॉलर गुंतवणुकीचे आश्वासन
अमेरिकेने देणे हे भारताच्या दृष्टीने सकारात्मक मुद्दे आहेत. संयुक्त
राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या कायम सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा
देणे, हे अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेच द्योतक आहे. त्याचबरोबर पाकिस्तान व
चीनसारख्या कुरापतखोर शेजाऱ्यांना या निमित्ताने इशारा मिळाला आहे. मात्र
त्याच बरोबर महासत्तेच्या छायेखाली न राहण्याची दक्षताही भारताला घ्यावी
लागणार आहे. नागरी अणू कराराच्या अंमलबजावणीत सर्वांत महत्त्वाचा मुद्दा
उत्तरदायित्वाचा होता. त्या मुद्दावर अमेरिकेला भूमिका बदलावी लागली, हेही
भारताचे यशच आहे.
आशिया-प्रशांत विभागातील भारताचे
महत्त्व ओबामा यांनी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात अधोरेखित केले. तसेच या
भागासाठी भारताने मोठी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा मोठी बाजारपेठ आणि मोठा तरुणवर्ग हे भारताचे
बलस्थान आहे, याचा विचार करूनच अमेरिकेने मैत्रीचा हात पुढे केला आहे.
मने जिंकली
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या तीन दिवसांच्या भारतभेटीत "नमस्ते‘, "धन्यवाद‘, "मेरा प्यार भरा नमस्कार‘, "दोस्ती‘, "चाय पे चर्चा‘ अशा विविध हिंदी अभिव्यक्तींचा वापर करून भारतीयांची मने जिंकली. परंतु त्याच्याच जोडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करताना, "बॉलिवूड स्टार‘, "मोदी कुडता परिधान करण्याची तीव्र इच्छा‘, "मोदी नवीन असल्याने त्यांना कमी झोप लागत असावी,‘ असे शब्दांचे मनोरेही उभारले. ओबामा दांपत्याच्या स्वागतासाठी राजशिष्टाचार बाजूला ठेवून विमानतळावर गेलेल्या मोदींच्या भगव्या शालीची स्तुती मिशेल ओबामा यांनीही केली.
भारतभेटीसाठी ओबामा यांचे 25 जानेवारीला आगमन झाल्यानंतर त्याच दिवशी भारत-अमेरिकेदरम्यान आण्विक दायित्व कायद्यामुळे अनिर्णित अवस्थेत पडून असलेल्या नागरी आण्विक ऊर्जा सहकार्य करार-123च्या अंमलबजावणीतील अडसर दूर करण्यात यश आले. यामध्ये ओबामा आणि मोदी यांच्यातील थेट चर्चा निर्णायक ठरली.

यानंतर
26 जानेवारीचा दिवसही ओबामांसाठी धावपळीचा ठरला. सकाळी दोन तास
प्रजासत्ताक दिनानिमित्तचे संचलन, त्यानंतर काही विशिष्ट व्यक्ती व
शिष्टमंडळांबरोबर भेटीगाठी, सायंकाळी राष्ट्रपती भवनातील "ऍट होम‘
कार्यक्रम, त्यानंतर भारत-अमेरिका उद्योग व व्यापार शिष्टमंडळ बैठका यांनी
व्याप्त होता. 26 जानेवारीलाच कॉंग्रेसचे उच्चस्तरीय शिष्टमंडळही ओबामा
यांना भेटले.
राष्ट्रपती भवानात प्रजासत्ताक
दिनानिमित्त आयोजित परंपरागत अशा "ऍट होम‘ कार्यक्रमात ओबामा दांपत्य
सुमारे अर्धा तास सहभागी झाले. काल सकाळपासूनच दिल्लीत पावसाची झिमझिम चालू
होती. सकाळचे संचलन जवळपास तशा पावसातच पार पडले. ओबामा यांना त्यांच्या
सुरक्षा सल्लागारांनी या कार्यक्रमाला केवळ 45 मिनिटे द्यावीत, असे सुचविले
होते; परंतु ओबामा यांनी तो सल्ला न मानता संपूर्ण, म्हणजे सुमारे दोन तास
राजपथावर उघड्यावर बसून संचलन पाहिले.
"ऍट होम‘
कार्यक्रम हा राष्ट्रपती भवनाच्या मागच्या बाजूला असलेल्या हिरवळीवर
उघड्यावर होतो. आकाशात पावसाच्या काळ्या ढगांची दाटी असतानाच आणि थंड वारे
वाहत असतानाच हा कार्यक्रम पार पडला.
ओबामा व मोदी या
दोघांनीही काल सायंकाळी "भारत-अमेरिका सीईओ फोरम‘च्या बैठकीत भाग घेतला. या
बैठकीत मात्र ओबामा यांनी भारतातील अनिश्चित अशी करविषयक धोरणे आणि
बौद्धिक संपदाविषयक अधिकारांबाबत असलेल्या अस्पष्टतेचा उल्लेख केला. या
कारणाने अमेरिकेतील निर्यातदारांमध्ये साशंकता आहे व त्याचा व्यापारावर
प्रतिकूल परिणाम होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताला स्वच्छ
ऊर्जानिर्मिती, रस्तेबांधणी, स्मार्टसिटी प्रकल्प, रेल्वे यांसारख्या व
अन्य पायाभूत क्षेत्रांच्या विकासाठी अमेरिकन वित्तसंस्थांतर्फे चार अब्ज
डॉलरच्या साह्याच्या घोषणेचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सर्वोत्तम विश्वासू साथीदार
दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी "सिरी फोर्ट ऑडिटोरियम‘मध्ये केलेल्या भाषणात ओबामा म्हणाले, ""भारतातील दोन दिवस आनंददायी होते, प्रजासत्ताक दिनाला येणे हा सन्मान समजतो. भारताबरोबर व्यापार करणाऱ्यांमध्ये अमेरिका कायम पहिल्या स्थानावर हवी. कारण अमेरिका हा भारताचा नैसर्गिक नाही, तर सर्वोत्तम साथीदार आहे.‘‘

‘सौर आणि पवन ऊर्जेसाठी दोन्ही देशांनी
एकत्र काम करायला हवे. वेगाने प्रगती करण्यासाठी इको फ्रेंडली ऊर्जेची
निर्मिती आवश्यक आहे,‘‘ असेही ते म्हणाले.
"भारतीय नागरिकांवर माझा विश्वास आहे, ते सर्वकाही करू शकतात, जयहिंद‘ अशा शब्दांत ओबामा यांनी दौऱ्याची सांगता केली.
ओबामांनी त्यांच्या मुलींना ज्या पद्धतीने वाढविले, ती बाब भारतासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या देशात मुले आणि मुली यांच्याबाबत असलेला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.
- नरेंद्र मोदी (मन की बात)
प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण दिवस येतातच. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. आपण दुसऱ्यांसाठी काम करत असताना मिळणारे समाधान इतर कशापेक्षाही अधिक असते. हीच माझी प्रेरणा आहे.
- बराक ओबामा (मन की बात)
राज्यघटनेने भारतीयांना धर्मस्वातंत्र्य बहाल केले आहे. जोपर्यंत धार्मिक आधारावर विखुरलेपण येणार नाही, तोपर्यंत भारताची वाटचाल यशस्वीच असेल.
- बराक ओबामा (सिरी फोर्ट येथील भाषण)
- तीन शहरे स्मार्ट होणार
- बडे बडे देशों मे...
- "बेटी बचाओ‘ला पाठिंबा
- ओबामांची हिंदी अभिव्यक्ती आणि शब्दांचे मनोरे...
- मोदींच्या सुटावरून वाद
- ओबामा आणि मोदींची
"मन की बात‘
- धार्मिक भेदभाव धोकादायक

0 comments