पुरातनकाल
Friday, January 02, 2015पुरातनकाल
आधीच दुर्बळ झालेल्या या ताम्रपाषाणयुगीन लोकांना त्यांच्या वस्त्यांमधून
हाकून लावण्यास दक्षिणेतून आलेले महापाषाणयुगीन संस्कृतीचे घोडेस्वारही
अंशतः कारणीभूत असावेत असे दिसते. फार थोड्या अवधीत ते ही गोष्ट साध्य करू
शकले. त्याचे श्रेय त्यांच्याजवळ असलेल्या उत्तम प्रतीच्या लोखंडी
हत्यारांना व चपळ घोड्यांना जाते. दक्षिण भारतात हे लोक सर्वत्र पसरलेले
होते. महाराष्ट्रात मात्र फक्त विदर्भात, विशेषतः नागपूरजवळ त्यांच्या
अस्तित्वाच्या खुणा अधिक मिळतात. हे महापाषाणयुगीन लोक मृत व्यक्तीला
विधीपूर्वक पुरत असत. त्यासाठी ते दफनस्थलाच्या भोवती मोठाले दगड गोलाकार
ठेवीन. म्हणूनच त्यांना महापाषाणयुगीन असे संबोधिले जाते. मृत व्यक्तीला
दागदागिन्यांनी शृंगारत असत, इतकेच नव्हे तर तिच्या घोड्यालाही सजवून
तिच्याबरोबर पुरत असत. याखेरीज बरीचशी लोखंडी अवजारे व हत्यारे पुरण्यात
येत. ही महापाषाणयुगीन संस्कृती महाराष्ट्रात इ.स.पू. साधारण १०००-५०० या
काळात नांदत होती.
0 comments