असा असेल २०१५ चा जॉब ट्रेंड

Monday, January 19, 2015

jobs
नववर्ष म्हणजे २०१५ हे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली बातमी घेऊन येणारे असणार आहे. २०१४ मध्ये भारताच्या अर्थकारणात अनेक चढउतार आले. नोकऱ्यांच्या बाबतीत २०१५ हे वर्ष निश्चितच चांगले असेल, अशी आशा आहे. या वर्षात मार्केटबरोबरच हायरिंगमध्येही तेजी असणार आहे. २०१५ वर्ष आपल्यासोबत कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या घेऊन येतेय, त्यावर एक नजर...

नव्या वर्षात या नोकऱ्यांकडे असेल सर्वांचे लक्ष

डिजिटल मार्केटर्स

भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या २०० दशलक्षपेक्षा जास्त आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील २ वर्षांत ऑनलाइन व्हिडीओ व व्हिडीओ अॅडव्हर्टायझिंगमध्ये मोठी तेजी आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात डिजिटल मार्केटर्समध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. डिजिटल मार्केटर्स सोशल नेटवर्कच्या माध्यमातून वस्तूंची विक्री करण्यात मदत करतील.

या क्षेत्रात मागणी असेल ः सर्व प्रकारच्या कंपन्या

पगारः एन्ट्री लेव्हलवर १ ते ४ लाख रुपये व वरिष्ठ स्तरावर ५० लाख रुपयांपेक्षा जास्त

रिटेल प्लॅनर

रिटेलचा व्यवसाय २०१३ मधील ७.५ टक्क्यांवरून वाढून २०१८ मध्ये १० टक्के होण्याची अपेक्षा आहे. रिटेलमधील वाढीमध्ये इ-कॉमर्सचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. टीमलीज सर्व्हिसेस चे सहसंस्थापक आणि वरिष्ठ उपाध्यक्ष रितुपुर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले, 'संशोधन, विक्री, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, स्टोअर्ससाठी चांगल्या दिसणाऱ्या वस्तूंची खरेदी व त्यांची देखभाल या गोष्टींची जबाबदारी प्लॅनिंग करणाऱ्यांवर असणार आहे.'

या क्षेत्रात मागणी असेलः इ-कॉमर्स

पगारः एन्ट्री लेवलवर २.५ ते ६ लाख दरमहा.

हेड, मॅन्युफॅक्चरिंग (बायोसिमिलर्स) (निर्मिती प्रमुख)

जगभरात बायोसिमिलर्सना प्रचंड मागणी वाढत असून येणाऱ्या काळात या मध्ये भारताची भूमिका ही महत्त्वपूर्ण असू शकते. हेड हंटर्स (भारत) चे मुख्य प्रतिनिधी क्रिस लक्ष्मीकांत यांनी सांगितले, 'जेव्हा बायोसिमिलर्सच्या निर्मितीप्रमुखांचा विचार केला जातो त्या वेळी स्थानिक पातळीवरील कौशल्याची कमतरता मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात येते. या कारणामुळे बहुतेकवेळा कंपन्या यासाठी बाहेरच्या लोकांना हायर करतात.'

या क्षेत्रात मागणी असेलः फार्मा एड लाइफ सायन्सेस

पगारः अनुभवी मॅन्युफॅक्चरिंग हेड्सना दरमहा १ कोटी रुपयांपेक्षा अधिक पगार मिळू शकतो.

स्वतंत्र निदेशक

प्रशासनात सुधार करणे हा संस्थांचा उद्देश असतो आणि त्यासाठी मंडळावर एखाद्या विषयातील तज्ज्ञाला सामील करून घेतले जाते. कंपनीच्या २०१३ च्या कायद्यातही बदल करण्याचा उद्देशही त्यामागे असतो. एक्झिक्युटिव्ह सर्च फर्म कॉर्न/फेरी इंटरनॅशनलच्या भागीदार व फायनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रमुख मोनिका अग्रवाल यांनी सांगितले, 'कंपनी अशा लोकांचा शोध घेते जे सीइओचे विश्वासू सल्लागार असतील व कंपनीची धोरणात्मक पत ज्यामुळे वाढू शकेल.'

या क्षेत्रात मागणी असेलः सर्व कंपन्यांमध्ये

पगारः कंपनी कायदा २०१३ नुसार नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला सिटिंग फीज आणि कमिशनच्या स्वरूपात पगार दिला जातो.

प्रॉडक्ट मॅनेजर्स

ऑनलाइन उद्योगांमध्ये वाढ झाल्याने प्रॉडक्ट मॅनेजर्सना मागणी वाढली आहे. एक्झिक्युटिव्ह सर्च फर्म ट्रान्ससर्चचे भागीदार डिजिटल प्रॅक्टस अनुज राय म्हणाले, 'मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. कारण २५ ते ३० दिग्गज इंटरनेट कंपन्यांकडून मागणी करण्यात येत असून पुरवठा करणाऱ्या कंपन्या केवळ ४ ते ५ आहेत. त्यामुळे कंपन्या कॅम्पसमधून नव्या एमबीएना हायर करून त्यांना प्रॉडक्ट रोल देऊन पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत.

या क्षेत्रात मागणी असेलः ऑनलाइन क्षेत्र

पगारः प्रॉडक्ट हेडचा पगार ६० लाख ते १.५ कोटी रुपयांपर्यंत असतो तर मध्यम मॅनेजरचा पगार ३० ते ६० लाखांपर्यंत असतो.

वरिष्ठ आयटी प्रोफेशनल्स

आयटी/टेलिकॉम उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात हायरिंगची शक्यता असून वरिष्ठ आयटी प्रोफेशनल्ससाठी हा चांगला काळ असणार आहे. मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर ए. जी. राव यांनी सांगितले, 'वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या वरिष्ठ प्रोफेशनल्ससाठी नोकरीच्या संधी दुप्पट झालेल्या आहेत. आम्ही तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात यात ६७ टक्के वाढ झालेली पाहिली आहे.'

या क्षेत्रात मागणी असेलः आयटी आणि टेलिकॉमशिवाय आयटीइएस, बीपीओ, बँकिंग आणि रिटेल उद्योग

पगारः ४ ते ७ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना १० ते ११ लाख, १० ते १५ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना २० लाखांहून अधिक, २० वर्षांहून अधिक अनुभव असणाऱ्यांना ४५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक पगार मिळू शकतो.

डाटा सायंटिस्ट्स

मागील काही वर्षांत ऑनलाइन ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या ग्राहकांच्या माहितीची आकडेवारी हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. मार्केटिंग किंवा सेल्सच्या टीम या ग्राहकांबरोबर चांगली प्रतिमा तयार होण्यासाठी तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे डेटा सायंटिस्ट्स सीआरओ/सीएमओ टीमचा महत्त्वाचा भाग बनत चालले आहेत. पण त्यांचा पुरवठा मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे डेटा सायंटिस्ट्ना पुढील काळात मार्केटमध्ये मागणी वाढणार आहे.

या क्षेत्रात मागणी असेलः टेलिकॉम, रिटेल, ऑनलाइन आणि एड नेटवर्क

पगारः डेटा सायंटिस्टना आपल्या कंपनीच्या विस्तारानुसार ८० लाख रुपयांपासून १.५ कोटी रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर्स अँड अॅनालिस्ट्स

संस्थांनी एसएमएसी (सोशल, मोबाइल, अॅनालिटिक्स, क्लाउड) तंत्रज्ञानाचा वापर वाढविला असून त्यामुळे डेटा मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागला आहे. मोठ्या डेटा विधींचा वापर करून त्यांचे विश्लेषण केले जाते. कंपन्यांची विक्री, ग्राहकांचे समाधान वाढविण्याबरोबरच संस्थेची अंतर्गत क्षमता आणखी वाढविण्यासाठी याची मदत होईल, अशी अपेक्षा कंपन्याकडून व्यक्त केली जात आहे. रेंडस्टँड इंडियाचे स्टाफिंग प्रेसिडेंट आदित्य नारायण मिश्रा यांनी सांगितले, '२०१५ मध्ये त्यांच्या मागण्यांमध्ये २० टक्के वाढ होणार आहे.'

या क्षेत्रात मागणी असेलः फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, स्टार्टअप्स

पगारः मध्यम स्तरावरील प्रतिनिधींना १० ते ३० लाख रुपये पगार मिळतो.

जनरल काउंसिल

कायदेशीर बाबींकडे संस्था भागीदारीच्या दृष्टिकोनातून बघतात आणि आधुनिक कायद्याची माहिती असणाऱ्या कायदेशील व्यावसायिकांचा शोध घेत असतात. भारतीय संस्थाचालक व्यापाराचा नव्या क्षेत्रात विस्तार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यात निष्णात असलेल्या माणसाचा शोध घेत असतात. त्यामुळे अशा संस्थामध्ये अधिक चांगल्या विकासाची अपेक्षा आहे.

या क्षेत्रात मागणी असेलः सर्व क्षेत्र, विशेषतः ऑटोमोबाइल, फार्मसी, इ-कॉमर्स आणि डिजिटल.

पगारः जनरल काउंसिलचा पगार हा अनुभव आणि पदावर अवलंबून असतो. त्यांचा पगार वार्षिक १.५ कोटी रुपये इतका असतो.

You Might Also Like

0 comments