'पीके'ने जमवला 611 कोटींचा गल्ला

Tuesday, January 27, 2015

मुंबई - चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनापासूनच चर्चेचा विषय असलेला आमीर खानचा "पीके‘ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अनेक धार्मिक संघटनांच्या टीकेचा आणि वादाचा विषय बनला आहे. आजवरचे अनेक विक्रम मोडत चित्रपटाने जगभरात तब्बल 611 कोटींची कमाई केली आहे.

बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून "पीके‘ची नोंद झाली आहे. देव आणि धर्माबद्दल एका परग्रहवासीयांच्या नजरेतून विचार व्यक्त करणाऱ्या या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच अनेक कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या टीकेचे धनी व्हावे लागले होते. आमीर खान, अनुष्का शर्मा, संजय दत्त, बोमन इरानी, सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केला होती. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी "पीके‘ने 6.85 कोटींचा गल्ला जमवला आणि आठवडाअखेरीस 11.50 कोटींची कमाई केली. प्रदर्शनानंतर 17 दिवसांतच 305.27 कोटींची कमाई केली होती. प्रदर्शनानंतर अवघ्या 19 दिवसांत 611 कोटींचा गल्ला करून "पीके‘ने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

You Might Also Like

0 comments