ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला काळाच्या पडद्याआड

Sunday, January 18, 2015

'जगात एकच सत्य ते म्हणजे मृतू' असे कोणीतरी म्हटले आहे.
 कोल्हापूर : जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे़. अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़. हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़ प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़. १९५०मध्ये किशोरकुमार यांच्या नायिका म्हणून ‘परदेस’ या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेतही त्यांनी मधुबालासोबत काम केले़. मधुबाला आणि शकुंतला यांच्या सौंदर्यामुळे या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला़

You Might Also Like

0 comments