आधुनिक शेळीपालन
Sunday, December 13, 2015आधुनिक शेळीपालन
शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागतपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळीघरी आणतो. मग दुसर्या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. अशाच पद्धतीने आपल्याराज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातआहेत.परंतु या पद्धतीत काही ङ्गायदे आहेत आणि काही दोषही आहेत. ङ्गायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्नच नसतो. मात्र या पद्धतीने ङ्गार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्याला शेळी पालनाचा उद्योग ङ्गार मोठ्याप्रमाणावरकरून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाचीनाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आतापुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्यामध्ये कायम कोंडून ठेवूनतिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्यालाबंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.त्याशिवाय ज्या शेतकर्यांना पूर्णपणे बंदिस्तशेळीपालनशक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकर्यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते. त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंदकेल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हा प्रकारच अधिक व्यवहार्य ठरणार आहे. मोकाट शेळी पालनामध्ये आंतरप्रजनन होत असते. त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो. पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजनानवर नियंत्रण ठेवू शकतो. बंदिस्त पालनात शेळ्यांच्या चार्यावर आणि आहारावर खर्च होतो ही गोष्ट खरीआहे. परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन भराभर वाढत जाते. जी गोष्ट मोकाट शेळी पालनात शक्य नाही. बंदिस्त शेळी पालनाचा आणखी एक ङ्गायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. बंदिस्त शेळीपालन करणार्यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा. या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत. निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूने कुंपण असलेले असावे. म्हणजे काही काळ शेळ्या छपराच्या गोठ्यात राहतील आणि काही काळ मोकळ्या हवेला छप्पर नसलेल्या गोठ्यात येतील.कोंबड्याप्रमाणे त्यांना चोवीस तासात छपराच्या गोठ्यात बांधण्याचीगरज नाही. गोठा थोडा उंचावर बांधावा. त्यात हवाखेळावी यासाठीआजूबाजूलाजाळी असावी. तसेच पावसाचे पाणी गोठ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सिमेंट पाईपचे दोन अर्ध गोलाकार तुकडे करून त्यांच्या गव्हाणी बनवाव्यात. त्या गव्हाणीमध्ये चारा आणि खुराक टाकता यावा.अशाचपाईपाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठीही करता येईल. हा गोठा बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गोठा बांधण्यासाठी ङ्गार खर्च करू नये. क्रॉंक्रिटच्या भिंती, सिमेंटचे पत्रे यांची काहीही आवश्यकता नाही. मात्र कोणालाहौसम्हणूनपॉश गोठा बांधायचा असेल तर त्यांना कोणअडवणार ?परंतु अशा गोठ्यावरहोणारा खर्च हा अनुत्पादक खर्च असतो आणि तो शेळ्यांच्या व्यवसायातून वसूल होणे अवघडजाते. मग नफ्या-तोट्याचे गणितबिघडते. शेळी पालन उद्योगामध्ये शेळीचे आरोग्य हा विषय सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे शेळीचा गोठा तयार करताना आरोग्याचा विचार करावा लागतो. विशेषत: शेळ्यांचे मलमूत्र त्या गोठ्यात साचून राहणारनाही याची दक्षता घ्यावी लागते.अजूनही बर्याच शेतकर्यांमध्ये शेळ्यांच्या मरण्याविषयी काही गैरसमज आहेत. शेळ्यांना रोग होऊन त्या पटापट मरतात असे बर्याच लोकांना वाटते. मात्र असे शेळ्या मरण्याचे प्रकार ङ्गार अपवादात्मक असतात. परंतु असा एखादाप्रकार घडला की, त्याच्या बातम्या वृत्तपत्रातमोठ्या प्रमाणावर छापून येतात आणि आधीच असलेला गैरसमज अधिक दृढ होतो. याचा अर्थ शेळ्या मरत नाहीत असा नाही, तर असे प्रकार ङ्गार कमी असतातआणि शेळ्यांच्या विविध रोगांसाठी द्यावयाच्या लसी वेळेवरदिल्या तसेच अधूनमधून आवश्यक असलेले औषध त्यांना देत गेलोतर शेळ्या मरण्याची शक्यता नसते. शेळ्यांच्या अंगावर गोचीड, पिसवा, उवा, लिखा यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अधूनमधून गोचीडनाशक पाण्याची आंघोळ घालावी. शेळ्यांना जंतनाशक औषध सुद्धा पाजावे लागते. ते वर्षातून दोनदा पाजले जाते. अशा औषधांची माहिती आणि उपचार यासंबंधी आपल्या नजिकच्या जनावरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करावी. त्यातल्या काही लसी या दवाखान्यात मिळत असतात. त्यांचा वापर करावा.शेळ्यांवरअसाइलाज करूनही शेळी काही अनामिक कारणाने मरू शकते. तिच्या अशा मृत्यूनंतर तिचीभरपाई मिळण्यासाठी शेळीचा विमा उतरवावा. मध्येच शेळी अचानक मेलीतर विमा कंपनीकडून भरपाईमिळू शकते. महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वावआहे आणि शेतकर्यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते हेही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणार्या संस्था शेळी पालनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करीत आहेत. ज्याशेतकर्यांनाबंदगोठा शेळी पालन करण्यामध्ये रूची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकर्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणीअसलेल्या जिल्हाउद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्ङ्गत काही माङ्गक ङ्गी घेऊन भरवल्या जाणार्या १२ दिवसांच्या शेळीपालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेळी पालनाविषयीच्या सर्व अंगोपांगांची माहिती त्रोटक स्वरुपात काहोईना पण मिळू शकते.सांघिक शेळीपालनशेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचेपूर्णशरीरच उपयोगाचे असते. आपण ङ्गक्त मटणाचाविचार करतो. पण शेळीची कातडी, शिंग, खूड, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचारच करत नाही.हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. शेळीच्या कातडीचा उपयोग तर कसा होतो असतो हे आपल्याला माहीतच आहे. पर्स, बॅगा तयार करण्यासाठी ही कातडीवापरली जाते. त्यानंतर हाडे. बर्याच जणांना हाडांचा एक उपयोग माहीत आहे, तो म्हणजे खत म्हणून. कोणत्याही जनावरांच्या हाडांची भुकटी शेतामध्ये खत म्हणून उपयुक्त असते. परंतु शेळीच्या हाडांची पावडर टूथ पेस्टमध्ये मिसळली जाते. म्हणजे आपणज्या टुथपेस्टने दात घासतो तिच्यात शेळीच्या हाडांची पावडर मिसळलेली असते. हाडांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे टुथपेस्टमध्ये ती मिसळली की, त्या टुथपेस्टमुळे दात मजबूत होतात,हा त्यामागचा विचार असतो. बरेच शाकाहारी लोक शाकाहाराची कडक पथ्ये पाळत असतात. त्यातल्या ज्या लोकांना टुथपेस्टमध्ये हाडे असतात हे माहीत असते ते लोक टुथपेस्टने दात घासत नाहीत ते यामुळेच. शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तूपरदेशात पाठविल्या तर त्यांना चांगली किंमत येते.आपण एखादी शेळी किंवा बोकड दोन किंवा तीन हजाराला विकून टाकतो,परंतु शिंगांचा योग्य वापर करणारा मासूण नुसत्या शिंगापासून दोन हजार रुपये कमवू शकतो. तशीच अवस्था खुरांची सुद्धा असते. शेळीच्या आणि बोकडांच्या खुरापासून शर्टाच्या गुंड्या (बटन) बनवल्या जातात. मेंढ्यांच्या केसापासून लोकर तयार होते हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु शेळीचे केस सुद्धा उपयुक्त असतात. या केसापासून पश्मिना नावाचा कपडा तयार होतो. हा कपडा ङ्गार महाग असतो. विशेषत: कोटांच्या आतल्या बाजूला अस्तर म्हणूनपश्मिना कापड वापरले जाते. पश्मिना कापडाच्या शाली आणि गरम कपडे ङ्गार महाग असतात. पश्मिनाचे एखादे स्वेटर साधारणत: हजार रुपयांना विकले जाते. शेळीच्या केसापासून हा कपडा तयार करण्याचे कसब काश्मीर आणि तिबेटमधल्या काही विशिष्ट कलाकारांनाच अवगत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांनी आपल्या शेळ्या निव्वळ विकून न टाकता सामूहिकरित्या कत्तलखाने उभे केले तर शेळीचे केस, खूर, शिंग, हाडे आणि चामडी या सर्वांचे पैसे शेतकर्यांच्याच पदरात पडू शकतील. म्हणून शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आपले स्वत:चेच कत्तलखाने उभे करणे ङ्गायद्याचेठरणार आहे.
आधुनिक शेळीपालना बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण व प्रकल्प अहवालासाठी संपर्क करा
चावडी शाखा
तुळजाई बिझनेस सोलूशन्स
परतवाडा , जिल्हा -- अमरावती
मो - 9860209533 / 9096669538 ,
Visit our website --www.Chawadi.co.in
0 comments