19 February Special...

Wednesday, February 15, 2017

छत्रपती शिवाजी महाराज खुद्द लष्करी मोहिमेत भाग घेत असत त्यावेळी ते अतिशय साधेपणाने राहत आणि वागत असत, सूरत मोहीम व कर्नाटक मोहिमेत अनेक यूरोपीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिले होते. या परकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सैन्याबद्दल नोंदी केलेल्या आहेत..

फ्रेंच गव्हर्नर मार्टिन लिहतो " महाराजांच्या सैन्यात फारसे सामानसुमान नव्हते अथवा स्त्रियाही नव्हत्या. मराठा फ़ौजेत फारसा तोफखानाही नव्हता त्यामुळे त्यांना आपल्या फ़ौजेच्या चपळ हलचाली करणे शक्य होत असे आणि शत्रुस सावध होण्यास व लढण्यासाठी सिद्ध होण्यास अवधी मिळत नसे "

डॉ. फेअर हा यूरोपीयन मराठा सैन्याबद्दल नोंद करतो " गाणेबजावणे, पोशाखाचा भपका, ऐट इत्यादी पासून मराठे अलिप्त असतात. कष्टमय जीवित, वेगाने दौड़ करण्याची सवय आणि सुखाकडे दुर्लक्ष या कारणामुळे शिवाजीचे हे लोक लष्करी पराक्रम करण्यास अधिक लायक आहेत "

डॉ फ्रायर हा यूरोपीयन प्रवासी मराठा लष्कराबद्दल लिहतो " शिवाजीच्या सैनिकांना हालअपेष्टांची सवय होती ते सुखासीन बनलेले नव्हते त्यामुळे कोणत्याही साहसी आक्रमणाला ते कायम तयार असत "

सूरत मोहिमेच्या दरम्यान तर छत्रपती शिवाजी महाराज एका झाडाच्या सावलीत उभे राहून मोहिमेचे नियोजन करत होते अशी नोंद आढ़ळते.

मराठा लष्कर किती सक्षम आणि प्रभावी होते याबद्दल परकीय इतिहासकार व्हिंन्सेंट स्मिथ लिहतो " अकबराचा जर मराठ्यांच्या चपळ सैन्याशी तोंड देण्याचा दुर्दैवी प्रसंग आला असता तर त्याचा पणतू औरंगजेब याच्यावर पुढे जो प्रसंग ओढ़ावला त्याहुन वेगळे काही घडलेच नसते ..

#शिवजन्मोत्सव_विशेष

#शिवराय_मना_मनात
#शिवजयंती_घरा_घरात
[16/02 7:17 am] Vaibhav Kharat: प्रशासन संचलित करण्यासाठी राजकीय ज्ञानासोबत तीव्र प्रशासकीय पात्रता असणे अत्यंत गरजेचे असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेस सुरुवात करत असताना परंपरेने चालत आलेल्या अनेक गोष्टीत अमुलाग्र बदल केलेले दिसतात. अष्टप्रधान मंडळ त्यांच्या त्याच प्रशासकीय बदलाचा एक भाग आहे तसेच तत्कालीन शासकात प्रचलित वेतनाच्या बदल्यात जहागिरीची प्रथा मोडीत काढली कारण प्रतिष्ठीत लोक जहागीरदार झाल्यास स्वराज्यासाठी नवे संकटे निर्माण करू शकतात असा दूरदर्शी विचार शिवाजी महाराजांनी नक्कीच केला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही प्रचलीत सिद्धांत मोडीत प्रशासनात काही नवीन सिद्धान्त आणले ते असे -

● मजबूत किल्ले बांधून शत्रुपासून राज्याचे संरक्षण .

● जहागीर बंद करून पगारी कर्मचारी .

● वंश परंपरेने नाही तर योग्यतेनुसार अधिकार्यांची निवड.

● विश्वसनीय व्यक्तींकडून कराची वसूली, जमीनदार अथवा मध्यस्थ नाही.

● जमीनी ठेक्यावर देण्याची पद्धत बंद केली.

● प्रशाकीय विभागांची स्थापना .

● सेवेत जातीय भेदभाव न करता सर्वांना समान संधी .

प्रशासन सुव्यवस्थित चालवण्यासाठी प्रशासनात चारित्रसंपन्न लोकांचे असणे गरजेचे असते आणि शिवाजी महाराजांचे यशाचे गमक हेच आहे.
आपल्या मतावर ठाम राहणे, निर्विवाद, आज्ञापालन आणि कठोर स्वयंशिस्त हे चांगल्या प्रशासकाचे जे नियम आहेत ते शिवाजी महाराजांच्या अंगी होते म्हणूनच ते तत्कालीन प्रशासकांमध्ये सुधारणावादी ठरले ..

१९ फेब्रुवारी
#शिवजयंती_घरा_घरात
#शिवराय_मना_मनात

You Might Also Like

0 comments