नवे सर्च इंजिन गुगलची सद्दी संपविणार का?

Monday, February 02, 2015

scinet'सायनेट' नावाचे अतिशय वेगवान आणि प्रभावी सर्च इंजिन शोधून काढल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हे इंजिन सध्याच्या सर्च इंजिनला मागे टाकेल अशी शक्यता असून त्यात सध्याच्या सर्च इंजिनपेक्षा अनेक वेगळी वैशिट्ये आहेत.

हेलसिंकी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये विकसित केलेल्या या सर्च इंजिनच्या माध्यमातून नेमकी माहिती सर्च होऊ शकणार आहे. आपल्याला एखादी गोष्ट शोधायची आहे. त्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही, अशी स्थिती असल्यास हे नवे इंजिन अधिक परिणामकारक ठरणार आहे. ठराविक विषय सर्च केल्यानंतर 'सायनेट' टॉपिक रडारमध्ये वेगवेगळे की-वर्ड देईल. या रडारवरील निर्देशानुसार हे सर्व विषय एकमेकांशी कसे संबंधित आहेत, हे दाखवेल. या प्रत्येक की-वर्डचा संदर्भ रडारच्या मध्यभागी दिसेल. त्यात अतिशय उपयुक्त आणि कमी कामाचे अशी विभागणीही असेल. ठराविक की-वर्डमुळे नेमकी माहिती शोधण्यास मदत होणार आहे. सर्च करताना हे इंजिन पर्यायी शब्दही देईल. शोध घेणाऱ्या व्यक्तीच्या कल्पनेपेक्षा अधिक नेमकी माहिती शोधण्यास त्यामुळे मदत होणार आहे. शोधकर्त्याने टाकलेला की-वर्ड रडारमध्ये फिरत असातना आपल्या उपयोगाची माहिती निवडावी लागणार आहे.

'सायनेट'चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही माहिती सर्च केल्यानंतर त्याच्या डिटेल्ससाठी त्या प्रत्येक पेजवर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रत्येक पेजमध्ये जाऊन माहिती वाचण्यात जाणारा अनावश्यक वेळ वाचेल. यासह आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत.

मटा अॅप सजेशन

पैशाची उधळपट्टी रोखणारे अॅप

पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांवर वचक ठेवणारे नवीन 'अ‍ॅप' तयार झाले आहे. हे अ‍ॅप महिन्याचे तुमचे अंदाजपत्रक तयार करणार असून, उधळपट्टीला लगाम लावणार आहे. Wallet - Track your budget असे या अ‍ॅपचे नाव आहे. तुम्ही कोणताही खर्च केल्यास हे अ‍ॅप्लिकेशन तुम्हाला त्याची तातडीने जाणीव करून देईल. तुमचा खर्च कोणत्या बाबींवर होतो, याची माहिती देणारे हे अॅप खर्च कसा कमी करावा, याचे निर्देशही देईल.

You Might Also Like

0 comments