गुगल ग्लासची नव्याने आखणी

Tuesday, February 24, 2015

गुगल ग्लासची प्राथमिक आवृत्ती बऱ्याच महिन्यांच्या चाचणीनंतर काही दिवसांपूर्वी गुगलने मागे घेतली. आता गुगल या ग्लासची पूर्णपणे नव्याने आखणी करणार असून, आराखडा पूर्ण झाल्यावरच तो मार्केटमध्ये सादर करणार आहे.

आयव्ही रॉस आणि टोनी फेडल या प्रकल्पाचे संचालक आहेत. 'गुगल ग्लासच्या पहिल्या अनुभवातून आम्हांला खूप काही शिकायला मिळाले. मुळात म्हणजे सर्वसामान्य ग्राहक आणि उद्योगांच्या गरजा वेगळ्या असतात, हे यातून लक्षात आले. आता नव्या गुगल ग्लाससाठी आयव्ही सोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. टीम लीडर म्हणून तिच्या मार्गदर्शनाखाली नव्याने गुगल ग्लासच्या निर्मितीत आम्ही झोकून देणार आहोत. गुगल ग्लासच्या प्राथमिक आवृत्तीमधून मिळालेले धडे नव्या डिझाइनच्या वेळी उपयोगात आणू', असे फेडेल यांनी सांगितले.

सुधारित गुगल ग्लास चाचणी म्हणून, सर्वसामान्यांना वापरायला दिला जाणार नाही. जोपर्यंत तो पूर्णपणे अचूक ठरत नाही तोपर्यंत, तो सर्वसामान्यांना उपलब्ध होणार नाही, असे फेडल यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले.

सर्वप्रथम २०१२ मध्ये गुगलने ग्लासचे प्रोटोटाइप चाचणीसाठी खुला केला होता. निवडक लोकांना चाचणीसाठी हा ग्लास देण्यात आला होता. मात्र, जानेवारीमध्ये गुगलने या ग्लासची विक्री थांबविली. मात्र, व्यावसायिक ग्राहकांना सपोर्ट कायम ठेवला आहे.

हाफकिन संस्था

बायोमेडिकल संशोधन क्षेत्रात हाफकिन संस्थेचे नाव मोठे आहे. या संस्थेविषयी www.haffkineinstitute.org या वेबसाइटवर माहिती घेता येऊ शकेल.

You Might Also Like

0 comments