गाडी चालवा जपून

Tuesday, February 24, 2015

बेफाम गाडी चालवण्याची तरुणाईमध्ये खूप आवड दिसून येते. पण त्यामुळे अनेक अपघात होऊ शकतात. यातले अनेक अपघात वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेही होताना दिसतात. म्हणूनच या नियमांचं कठोर पालन केलं पाहिजे.

दुचाकी चालवताना घ्या काळजी गाडी भरधाव वेगाने चालवू नका. रस्त्यावरील वेग मर्यादा सूचना फलकानुसार वाहनाचा वेग ठेवा. ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय गाडी चालवू नका. ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजूने करा. लेनची शिस्त पाळा. वळण्यापूर्वी इशारा करावा. हेल्मेटचा वापर जरूर करावा. झेब्रा क्रॉसिंग अगोदरच आपले वाहन थांबवा. वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने आपली गाडी पार्क करू नका. पार्किंगच्या सर्व नियमांचे पालन करा.

सीटबेल्टचे फायदे

सीटबेल्ट वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. सीटबेल्टमुळे दुर्दैवाने वाहनाची धडक झाल्यास डोके स्टेअरिंगवर आपटत नाही. वाहनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. धडकेमध्ये बाहेर फेकले जाण्याची शक्यता रहात नाही.

You Might Also Like

0 comments